Join us  

शिवसेनेची दुटप्पी भूमिका, भाजपाच्या दबावाखाली- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 6:15 AM

देशव्यापी भारत बंदला राज्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.

मुंबई : देशव्यापी भारत बंदला राज्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. मात्र, काही ठिकाणी सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच महागाईच्या नावाने शंख करणाऱ्या शिवसेनेची दुटप्पी भूमिकाही उघड झाली, अशी टीकाही त्यांनी केली.खा. चव्हाण म्हणाले, जनतेने देशव्यापी बंदला चांगला प्रतिसाद दिला. जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी हा बंद होता. बंद १०० टक्के यशस्वी झाला असा आपण दावा करणार नाही, पण सर्वसामान्य जनता आणि व्यापाºयांनी चांगला प्रतिसाद दिला. शिवसेनेने महागाईचे फलक मुंबईत लावले; मात्र नुसते फलक लावून चालत नाही. रस्त्यावर उतरायला हवे होते. शिवसेनेचे सत्तेत राहणेही नैतिकतेला धरून नाही. शिवसेनेला जराही लाज असती तर ते आज आंदोलनात उतरले असते. शिवसेना भाजपाच्या दबावाखाली काम करत आहे. राज्य सरकार ३९ टक्के व्हॅट घेत आहे. पेट्रोलच्या प्रत्येक १०० रुपयातले ३९ रुपये राज्य सरकार घेत आहे. फडणवीस यांनी ठरवले तर पेट्रोल २० ते २५ रुपयांनी आत्ता स्वस्त होऊ शकते, पण सरकारला जनतेशी देणंघेणं नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :अशोक चव्हाणभारत बंद