शिवसेना संपर्कमंत्री नियुक्त करणार

By Admin | Updated: February 21, 2015 03:15 IST2015-02-21T03:15:04+5:302015-02-21T03:15:04+5:30

शिवसेना आपल्या १२ मंत्र्यांकडे प्रत्येकी तीन याप्रमाणे वेगवेगळ््या जिल्ह्यांची जबाबदारी लवकरच सोपवण्यात येणार आहे.

Shiv Sena will be the Contact Minister | शिवसेना संपर्कमंत्री नियुक्त करणार

शिवसेना संपर्कमंत्री नियुक्त करणार

मुंबई : शिवसेना आपल्या १२ मंत्र्यांकडे प्रत्येकी तीन याप्रमाणे वेगवेगळ््या जिल्ह्यांची जबाबदारी लवकरच सोपवण्यात येणार आहे. त्यामध्ये दिवाकर रावते (मराठवाडा), विजय शिवतारे (पश्चिम महाराष्ट्र), रवींद्र वायकर (कोकण) या विभागातील जिल्ह्यांचे संपर्कमंत्री असतील. दरम्यान, जिल्ह्णांचे संपर्क प्रमुख नेमताना नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांकडे वेगवेगळ््या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिलेली आहे. मात्र सध्या जेथे भाजपाचे पालकमंत्री आहेत तेथे शिवसेना आपल्या मंत्र्यांना संपर्कमंत्री नियुक्त करणार आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील पालकमंत्री असलेल्या रावते यांना जवळच्याच जिल्ह्यांचे संपर्कमंत्री केले जाणार आहे. त्याच धर्तीवर मुंबई शहर व उपनगर जिल्हे वगळून राज्यात शिवसेना संपर्कमंत्री नियुक्त करणार आहे. दरम्यान, नवे संपर्क प्रमुख नियुक्त करताना सुनील शिंदे, सत्यवान हुबे, मनोहर गायके, संजय सावंत, राहुल शेवाळे या तरुण व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेनेचे संपर्क प्रमुख असे: रवींद्र मिर्लेकर- नंदुरबार, धुळे, जळगाव, खा. प्रतापराव जाधव- बुलढाणा, खा. अरविंद सावंत- अकोला, अमरावती, अशोक शिंदे- चंद्रपूर, वर्धा, डॉ. दीपक सावंत- लोकसभा रामटेक, नागपूर शहर, खा. कृपाल तुमाने- भंडारा, गोंदिया, किशोर कन्हेरे- गडचिरोली, सहसंपर्क प्रमुख नागपूर, विश्वनाथ नेरुरकर- यवतमाळ, वाशिम, बबन थोरात- हिंगोली, नांदेड, सुभाष भोईर- परभणी, विनोद घोसाळकर- औरंगाबाद, जालना, सुहास सामंत- लोकसभा दिंडोरी, आ. अजय चौधरी- नाशिक (दिंडोरी लोकसभा वगळून), अनंत तरे- लोकसभा पालघर, आ. एकनाथ शिंदे- लोकसभा भिवंडी, कल्याण, ठाणे, आदेश बांदेकर- रायगड, डॉ. अमोल कोल्हे- पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, सत्यवान उभे- लोकसभा बारामती, मनोहर गायखे- लोकसभा शिरूर, भाऊ कोरगावकर- लोकसभा नगर (दक्षिण), आ. सुनील शिंदे- लोकसभा शिर्डी (नगर उत्तर), सुधीर मोरे- बीड, गौरीश शानभाग- उस्मानाबाद, संजय सावंत- लातूर, खा. राहुल शेवाळे- सोलापूर, प्रा. नितीन बानगुडे पाटील- सातारा, सांगली, विजय कदम- रत्नागिरी, अरुण दुधवडकर- सिंधुदुर्ग, कोल्हापूर.

Web Title: Shiv Sena will be the Contact Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.