Join us

...आणि पुन्हा घुमला आवाज शिवसेनेचा! विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी शिवसैनिकांची मातोश्रीवर गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 06:16 IST

मुंबई :ऋतुजा लटके यांचा विजय होणार हे निश्चित झाल्यानंतर शिवसेना भवन परिसरात शिवसैनिकांची गर्दी होऊ लागली. विजयाचा जल्लोष ...

मुंबई :

ऋतुजा लटके यांचा विजय होणार हे निश्चित झाल्यानंतर शिवसेना भवन परिसरात शिवसैनिकांची गर्दी होऊ लागली. विजयाचा जल्लोष सुरू झाला. ‘आवाज कोणाचा’ यासारख्या घोषणांबरोबच ही सुरुवात आहे, पुढे आणखी काय काय होते हेही पाहा, अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिल्या. एकनाथ शिंदे यांचा बंडानंतर संभ्रमावस्थेत असलेल्या शिवसैनिकांत चैतन्य परसले. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांची वांद्र्याची वाट धरली. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावरील पोलिसांची सुरक्षा आणि भेटीसाठी येणाऱ्यांची गर्दी कमी दिसत असे. मात्र, रविवारी वर्दळ वाढली होती. अंतिम निकालाची घोषणा होताच शिवसैनिकांनी मोटर बाइक रॅली काढत मातोश्रीवर हजेरी लावली.

विजयी होताच ऋतुजा लटके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नंतर लटके यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन वंदन केले. 

लटकेंना दोन्ही निवडणुकांपेक्षा अधिक मते दिवंगत रमेश लटके यांना २०१४ आणि २०१९ अशा दोन विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे ५२ हजार ८१७ आणि ६२ हजार ७७३ मते मिळाली होती. ऋतुजा लटके यांना या दोन्ही निवडणुकांपेक्षा जास्त मते मिळाली. 

टॅग्स :शिवसेना