Join us  

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट, शिवसेना प्रणीत महासंघ तटस्थ राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 5:05 AM

शासकीय कर्मचारी व अधिकाºयांनी ७ ते ९ आॅगस्टदरम्यान पुकारलेल्या संपामध्ये सामील न होण्याचा निर्णय शिवसेना प्रणीत भारतीय कामगार सेना संलग्नित संघटनांनी जाहीर केला आहे.

मुंबई : शासकीय कर्मचारी व अधिकाºयांनी ७ ते ९ आॅगस्टदरम्यान पुकारलेल्या संपामध्ये सामील न होण्याचा निर्णय शिवसेना प्रणीत भारतीय कामगार सेना संलग्नित संघटनांनी जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ (शासन मान्यता प्राप्त संघटनांचा समूह) आणि महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिक/औद्योगिकेत्तर कर्मचारी कामगार संघ (शासन मान्यता प्राप्त संघटना) यांचा समावेश आहे. महासंघाचे प्रमुख सल्लागार शंकर मोरे यांनी ही माहिती दिली.दिवाळीपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने उगाच संपाचे हत्यार उपसण्याची गरज नसल्याचे मत महासंघाचे अध्यक्ष अ.द. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कुलकर्णी म्हणाले, पाच आठवड्यांच्या मागणीवरही शासनासोबत चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री या मागणीबाबत सकारात्मक आहेत.

टॅग्स :आंदोलन