Join us  

Maharashtra Politics: बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा!; शिवसेनेचा नवा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 6:43 PM

Maharashtra News: आगामी मुंबई महानगपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी कठीण ठरणारी असून, भाजपसह शिंदे गटाचे मोठे आव्हान असणार आहे.

Maharashtra Politics: मुंबई, ठाणेसह राज्यातील अनेक ठिकाणच्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. पण, संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष हे मुख्यत: मुंबई महानगरपालिका निवडणुकांकडे आहे. कारण, उद्धव ठाकरेंना तगडे आव्हान देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे. शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर उद्धव ठाकरेंसमोर पक्ष वाचवण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. यातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसाठी सोपी नक्कीच नाही. यातच आता बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा, असा नवा नारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. 

शिवसेनेच्या या नव्या नाऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेने या आधी देखील टॅग लाईनच्या माध्यमातून विरोधकांना जेरीस आणल्याच पाहिला मिळाले आहे. नुकतेच ४० बंडखोर आमदारांना पन्नास खोके एकदम ओक्के, गद्दारांना माफी नाही, अशा आशयाच्या घोषणा आणि फ्लेक्स पाहिला मिळाले होते. शिवसेनेचा इतिहास पाहता सेनेने कायम टॅग लाईनची मदत आपल्या प्रचारासाठी आणि विरोधकांवर टीकेसाठी घेतली आहे. 

बदल सोडाच गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा

मागील महापालिका निवडणुकीत 'करून दाखवलं' ही टॅग लाईन तर आता आगामी पालिका निवडणुकीत 'बदल सोडाच गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा' ही टॅगलाईन घेऊन सेना निवडणुकीला सामोरे जाताना पाहिला मिळत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही फार प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला पुन्हा संधी मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका निवडणुक 2022मुंबई महापालिका निवडणूक २०२२शिवसेनाउद्धव ठाकरे