शिवाजी पार्क मैदानासाठीचा अर्ज मागे घेण्यास कारण की; हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा

By जयंत होवाळ | Published: October 10, 2023 07:03 PM2023-10-10T19:03:59+5:302023-10-10T19:04:17+5:30

दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क मैदानावरील दावा सोडला

shiv sena eknath shinde group gave up his claim on shivaji park ground for dasara melava | शिवाजी पार्क मैदानासाठीचा अर्ज मागे घेण्यास कारण की; हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा

शिवाजी पार्क मैदानासाठीचा अर्ज मागे घेण्यास कारण की; हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्याबाबत पालिकेकडे केलेला अर्ज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अधिकृतरीत्या मागे घेतला. तसे रीतसर पात्र आमदार सदा सरवणकर यांनी जी-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा व हे सण हिंदू धर्मियांना तसेच महाराष्ट्र प्रेमींना आनंदाने साजरे करता यावेत यासाठी अर्ज मागे घेत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. अर्ज मागे घेतल्याने एकप्रकारे पालिकेची डोकेदुखी संपली आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेने १ आणि ७ ऑगस्ट रोजी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्याबाबत पालिकेकडे अर्ज केला होता.  यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेने पालिकेककडे अर्ज केला होता. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी शिवाजी पार्क मैदानावरून दोन्ही बाजूत संघर्ष पेटला होता आणि नेहमीप्रमाणे पालिकेची अडचण झाली होती. पालिकेने कोणत्याच अर्जावर निर्णय घेतला नव्हता. मात्र दिवस पुढे जात होते, तसा  पालिकेवरील दबावही वाढत होता. सोमवारी ठाकरे गटाचे अनिल परब यांनी सहायक आयुक्तांची भेट घेऊन परवानगीचे काय झाले , अशी विचारणा केली होती. त्यावर दोन दिवसात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सहायक आयुक्तांनी सांगितले होते.

नेमक्या त्याच दिवशी अन्य पर्यायी मैदानाचा आम्ही शोध घेत आहोत, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सागितल्याने शिंदे गट शिवाजी पार्कातून माघार घेणार हे स्पष्ट झाले होते. मंगळवारी अर्ज मागे घेण्याचे रीतसर पत्र दिल्याने वाद संपुष्टात आला आहे.

Web Title: shiv sena eknath shinde group gave up his claim on shivaji park ground for dasara melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.