शिवसेना नगरसेविकेचा माफीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 07:24 AM2021-04-22T07:24:24+5:302021-04-22T07:24:37+5:30

शिवसेनेच्या नगरसेविका दोशी यांनी कोरोनासारख्या सामाजिक आपत्तीत पदाचा गैरवापर करत भगवती रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात अश्लील, अर्वाच्च भाषेचा वापर केला आहे.

Shiv Sena corporator's apology |  शिवसेना नगरसेविकेचा माफीनामा

 शिवसेना नगरसेविकेचा माफीनामा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवलीतील पालिकेच्या भगवती रुग्णालयात एका रुग्णाला भरती करण्यावरून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका संध्या दोशी व रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये वाद झाला. त्यानंतर नगरसेविका दोशी यांनी कार्यरत डॉक्टराना अपमानास्पद वागणूक देत अर्वाच्च भाषेचा वापर केला. याप्रकरणी नगरसेविका दोशी यांनी व्हिडीओ प्रसारित माफी मागितली आहे. त्यानंतर निवासी डॉक्टर पुन्हा सेवेत रुजू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
शिवसेनेच्या नगरसेविका दोशी यांनी कोरोनासारख्या सामाजिक आपत्तीत पदाचा गैरवापर करत भगवती रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात अश्लील, अर्वाच्च भाषेचा वापर केला आहे. सद्यस्थितीत मुंबईमधील डॉक्टर सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. नगरसेविका दोशी यांच्या वर्तनामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची होणार आहे. दोशी या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा आहेत. त्यांचे वर्तन पदाला साजेशे नाही, अशी टीका सर्व स्तरातून झाली. 


भगवती रुग्णालयात अशी घडली घटना 
डॉक्टरांबरोबर वाद घालतानाचा संध्या दोषी यांचा व्हिडीओ समोर आला. यामध्ये डॉक्टरांशी हुज्जत घालत त्यांना धमकावताना संध्या दोशी दिसतात. "डॉक्टरांना नीट बोलायला शिकवा, दहा हॉस्पिटलमध्ये दहा डॉक्टर उभे करीन. डॉक्टर असाल तर आपल्या घरी, डॉक्टर मला शहाणपणा शिकवतोय" या शब्दात त्यांनी एका डॉक्टरबरोबर वाद घातला. कांदिवली चारकोपमधून नगरसेविका असलेल्या संध्या दोशी या शिक्षण समितीच्या अध्यक्षही आहे.

 

डाॅक्टरांना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
 कांदिवली येथील भगवती रुग्णालयातील डाॅक्टरांशी अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका संध्या दोशी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली.


दोशी यांनी कोरोनासारख्या सामाजिक आपत्तीत पदाचा गैरवापर करत भगवती रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात अश्लील, अर्वाच्य भाषेचा वापर केला. सद्यस्थितीत डॉक्टर जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. नगरसेविका दोशी यांच्या वर्तनामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची होईल. दोशी स्वतः पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा आहेत. डॉक्टरांविरोधात अरेरावीची भाषा करणारे वर्तन पदाला साजेसे नाही. दोशींसाेबतच्या व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये मास्क घातलेला नाही. याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. पालिका आयुक्तांनी तातडीने दोशींवर गुन्हा दाखल करून त्यांना डॉक्टरांची माफी मागायला लावावी, तसेच त्यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदाचा राजीनामा त्वरित घ्यावा, अशी मागणी कर्पे यांनी केली.
 

Web Title: Shiv Sena corporator's apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.