शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला मंजूरी!

By Admin | Updated: September 8, 2014 00:48 IST2014-09-08T00:48:07+5:302014-09-08T00:48:07+5:30

कल्याणमधील काळातलाव नजीकच्या एक एकर जागेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीची रविवारी मंजूरी मिळाली

Shiv Sena chief's memorial approves! | शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला मंजूरी!

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला मंजूरी!

डोंबिवली : कल्याणमधील काळातलाव नजीकच्या एक एकर जागेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीची रविवारी मंजूरी मिळाली. विशेष तत्वावर घेण्यात आलेल्या स्थायीच्या बैठकीत मंजूरीसह निविदाही काढण्यात आल्याची माहिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिली.
येथे स्मारकासह म्युझीयम, इ लायब्ररी आणि अन्य लोकोपयोगी प्रकल्पांना प्राधान्य देणार असल्याचेही ते म्हणाले. सेना पक्ष कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसारच हे स्मारक बांधण्यात येत असून ९ महिन्यांमध्ये त्या कामाची पूर्तता होईल असा विश्वासही म्हात्रे यांनी व्यक्त केला. रविवारच्या सभेत केवळ हाच ठराव झाल्याचे ते म्हणाले. या स्मारकाला १० कोटी खर्च अपेक्षित आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena chief's memorial approves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.