Join us  

प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपामध्ये चुरस; कोण मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 9:24 PM

एकूण १७ प्रभाग समित्यांपैकी सहा समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी पार पडली.

मुंबई - काँग्रेस पक्षाने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे पालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपने प्रभाग समित्यांसाठी मात्र कंबर कसली आहे. सर्वाधिक संख्याबळ असलेला दुसरा मोठा पक्ष असल्याने तीन प्रभाग समित्यांवर भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. तर, पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. उर्वरित नऊ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस होणार आहे.

एकूण १७ प्रभाग समित्यांपैकी सहा समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. यापैकी जी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दत्ता नरवणकर, ‘जी/उत्तर’ प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे जगदीश मक्कुनी थैवलपिल,‘सी’ आणि ‘डी’ प्रभागात भाजपच्या मीनल पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी भाजपच्या मकरंद नार्वेकर यांचा पाच मतांनी पराभव केला. 

एच पूर्व’ आणि ‘एच पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रज्ञा भूतकर यांनी आठ मते मिळवत भाजपच्या हेतल गाला यांचा चार मतांनी पराभव केला. तर ‘एफ दक्षिण’ ‘एफ उत्तर’ प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे रामदार कदम यांनी १० मते मिळवत भाजपच्या नेहल शहा रांचा ७ मतांनी पराभव केला. वैधानिक समित्यांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने प्रभाग समित्यांमध्ये मात्र शिवसेनेच्या बाजूने मतदान केले आहे.

या प्रभाग समित्यांमध्ये चुरस

प्रभाग....शिवसेना......भाजपआर-उत्तर व मध्य - सुजाता पाटेकर.... आसावरी पाटीलआर दक्षिण विभाग- एकनाथ हुंडारे... लिना देहेरकरपी/ उत्तर....संगीता सुतार.... दक्षा पटेलके/ पूर्व - प्रियांका सावंत....अभिजित सामंतके/ पश्चिम - राजू पेडणेकर.. सुधा सिंगएफ/दक्षिण- एफ/उत्तर.. रामदास कांबळे.. नेहल शाहएस अँड टी...दिपमाला बढे.... जागृती पाटीलएन ... स्नेहल सुनील मोरे...बिंदू त्रिवेदी

या प्रभागात बिनविरोध

पी/ दक्षिण

भाजप: भार्गव पटेल

एम / पश्चिम

भाजप: महादेव शिवगण 

एम / पूर्व

शिवसेना : विठ्ठल लोकरे 

एल प्रभाग

शिवसेना : आकांशा शेट्ये 

टॅग्स :शिवसेनाभाजपामुंबई महानगरपालिकानिवडणूक