भायखळ्यात शिवसैनिक अस्वस्थ
By Admin | Updated: September 28, 2014 00:51 IST2014-09-28T00:51:52+5:302014-09-28T00:51:52+5:30
भायखळा विधानसभा मतदारसंघात मात्र अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना पाठिंबा जाहीर केल्याने स्थानिक शिवसेना कार्यकत्र्यामध्ये नाराजी पसरली आहे.
भायखळ्यात शिवसैनिक अस्वस्थ
>स्नेहा मोरे - मुंबई
शिवसेनेने राज्यभरातून 286 उमेदवारांचे अर्ज दाखल केले असले तरी, भायखळा विधानसभा मतदारसंघात मात्र अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना पाठिंबा जाहीर केल्याने स्थानिक शिवसेना कार्यकत्र्यामध्ये नाराजी पसरली आहे.
भायखळा मतदारसंघात सेनेचे यशवंत जाधव आणि रमाकांत रहाटे यांची नावे चर्चेत होती. त्यानंतर सेनेची पहिली यादी जाहीर झाली, त्यात यशवंत जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र शुक्रवारी रात्री अचानक ‘मातोश्री’वरून सूत्रे हलली आणि जाधवांना ‘बॅकआऊट’ होण्याचे आदेश आले. त्यानंतर रमाकांत रहाटे यांना उमेदवारी मिळेल अशी आशा स्थानिक कार्यकत्र्याना होती. मात्र त्या आशेवरही पाणी ओतले गेले आणि दोनदा पालिकेच्या निवडणुकीत सेनेला मदत केलेल्या अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला.
या मतदारसंघात धनुष्यबाणाचे नावच नसल्याने सेनेच्या स्थानिक कार्यकत्र्यामध्ये तीव्र नाराजी असून, त्याचे पडसाद निवडणुकीत दिसून येतील. या मतदारसंघात उमेदवार म्हणून गीता गवळी यांचा चेहरा नवा असल्याने त्यांना ब:यापैकी लढत द्यावी लागणार आहे. या मतदारसंघात पूर्वी बाळा नांदगावकर, छगन भुजबळ यासारख्या दिग्गजांनी ‘धनुष्यबाणा’च्या चिन्हावर निवडणूक लढवली असूनही यंदा मात्र धनुष्यबाणाचे चिन्हच दिसणार नसल्याने शिवसैनिकांनी खंत व्यक्त केली आहे.
अरुण गवळी गुन्हेगारी खटल्यात अडकल्याने त्याच्याऐवजी गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गीता गवळी यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्षपद असून, सहा महिन्यांपासून त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे.
अखिल भारतीय सेनेकडे वॉर्ड क्रमांक 2क्4 व 2क्5मधील नगरसेवक असल्याच्या जोरावर भायखळ्यातून गीता गवळींनी दावेदारी ठोकली आहे. आणि शिवसेना आणि अखिल भारतीय सेनेतील समझोत्यानुसार शिवसेनेने गीता गवळी यांना पाठिंबा दिला. याच मतदारसंघातून गेल्या वेळी अरुण गवळीला तिस:या क्रमांकाची 25 हजार मते मिळाली होती. तर, काँग्रेसचे विजयी उमेदवार मधू चव्हाण यांना 36 हजार मते मिळाली होती. (प्रतिनिधी)
च्पुरस्कृत उमेदवार म्हणून गवळी यांना पाठिंबा देण्यास पदाधिका:यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत नकार दिला होता. तरीही गवळी यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केल्याने सर्वच शिवसैनिकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे सूत्रंनी सांगितले.
च्आपली नाराजी पक्षश्रेष्ठीर्पयत पोहोचावी म्हणून लवकरच निष्ठावंत शिवसैनिकांची एक बैठक आयोजित करून ‘नोटा’ अधिकाराचा वापर करून शिवसैनिक रोष व्यक्त करणार असल्याचे एका पदाधिका:याने सांगितले.