Join us  

Maharashtra Politics: “मोदीजी, चित्त्याचा फोटो काढलात, पण वाघाचा फोटो काढायला ५ ऑक्टोबरला शिवतीर्थावर या”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 9:25 PM

Maharashtra News: एकनाथ शिंदेंनी जनतेचे तळतळाट घेतले असून, पंढरीची वारी जरी त्यांनी केली असली तरी विठुराय आम्हाला पावला, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकाने दिली.

Maharashtra Politics: मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत परवानगी दिल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात मोठा जल्लोष केला. शिवसेना भवन येथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर आनंद साजरा करत एकमेकांना पेढे भरवले आहेत. यावेळी शिवसेनेच्या वाघिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. पंतप्रधान मोदी चित्त्यांचे फोटो काढण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेले. आता वाघाचे फोटो काढण्यासाठी दसऱ्याला शिवतीर्थावर या, असे या महिला शिवसैनिकाने म्हटले आहे. 

उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला एक अट घातली, यात दोषी आढळले तर पुढच्या वेळी परवानगी नाकारण्यासाठी ते कारण ठरेल असाही इशारा न्यायालयाने दिला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देताना  कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. पोलीस व्हिडीओ शुटींग करतील. काही घटना घडली आणि याचिकाकर्ते कोणत्याही घटनेला जबाबदार असल्याचे आढळले तर भविष्यात त्यांना तिथे दसरा मेळावा नाकारण्याचे कारण ठरू शकेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. यातच एका शिवसैनिकाने थेट पंतप्रधान मोदींना दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येण्याचे आव्हान दिले आहे. 

उच्च न्यायालयाचा निकाल शिवसैनिकांमध्ये प्राण फुंकणारा

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने दिलेला निकाल हा शिवसैनिकांमध्ये प्राण फुंकणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देऊ इच्छिते की, आपण चित्त्याचा फोटो काढण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. आता वाघाचा फोटो काढण्यासाठी मुंबईत शिवतीर्थावर या. तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये मावणार नाही, पण इतक्या जिगरबाज आणि निष्ठावंतांचा फोटो काढून जा, असे या महिला शिवसैनिकाने म्हटले आहे. शिवसेनेतील निष्ठावंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमच्या ग्रामीण भागात असे म्हटले जाते की, राजकारण्यांनी जनतेचे आशीर्वाद घ्यावेत. जनसामान्यांचे तळतळाट घेऊ नयेत. एकनाथ शिंदे यांनी नेमके तेच केले. पंढरपुराची वारी तुम्ही केली, पण विठुराय आम्हाला पावला. शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, अशी आक्रमक प्रतिक्रिया या युवा शिवसैनिकाने दिली. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या संयमाचा हा विजय आहे. उद्धव ठाकरे विनम्रपणे सांगते होते. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. हा आत्मविश्वास त्यांच्या ठायी क्षणोक्षणी दिसत होता. आमच्या परंपरेचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्काराचा आणि मातोश्रीशी निष्ठावंत असलेल्या शिवसैनिकांचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

 

टॅग्स :शिवसेनानरेंद्र मोदी