Join us

अचला जोशी यांना शिरीष पै पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 20:57 IST

दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी शिरीष पै जयंती आणि दैनिक मराठा वर्धापनदिन असा संयुक्त कार्यक्रम आत्रेय ही संस्था साजरा करीत असते.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आत्रेय समितीने यंदाच्या शिरीष पै पुरस्कारासाठी कर्तृत्ववान उद्योजिका, लेखिका अचला जोशी यांची निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह आणि रोख रक्कम २१ हजार रुपये आहे, अशी माहिती आत्रेय समितीने दिली आहे. यंदा पुरस्कार वितरण सोहळा आज (गुरुवारी) १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे होणार आहे.

दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी शिरीष पै जयंती आणि दैनिक मराठा वर्धापनदिन असा संयुक्त कार्यक्रम आत्रेय ही संस्था साजरा करीत असते. यानिमित्त शिरीष पै पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे भूषविणार आहेत. यावेळी अचला जोशी यांना हा पुरस्कार डॉ. अविनाश फडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभानंतर आचार्य अत्रे यांच्या १२५व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून अशोक हांडे प्रस्तुत ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा आचार्य अत्रे यांचा जीवनपट मांडणारा संगीतमय कार्यक्रम सादर केला जाणार आहे.