Join us
Daily Top 2Weekly Top 5

हापूस अन् केशर आंब्याची खेप जपानला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 09:12 IST

अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स बेरीडेल फूड्स (ओपीसी) प्रा. लि. यांनी जपानच्या लॉसन रिटेलला हापूस व केशर आंबा निर्यात केला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) हंगामातील हापूस आणि केशर आंब्याची पहिली खेप शनिवारी जपानला निर्यात केली. हे आंबे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने प्रक्रिया करून पॅकिंग केले आहेत.

अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स बेरीडेल फूड्स (ओपीसी) प्रा. लि. यांनी जपानच्या लॉसन रिटेलला हापूस व केशर आंबा निर्यात केला. दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जपानच्या टोकियोमध्ये भारतीय दूतावास आणि इन्व्हेस्ट इंडिया यांनी सोमवारी आंबा महोत्सवाचे आयोजन केले. अपेडाने निर्यातीला प्रोत्साहन देण्यास ऑनलाइन व्यापार मेळे (ट्रेड फेअर्स), शेतकऱ्यांसाठी पोर्टल, ई-ऑफिस, हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी सिस्टीम, खरेदी-विक्री मेळावा अशा उपक्रमांचे आयोजन केले आहे.

टॅग्स :आंबाजपान