गावाच्या जागी केले शिवार!
By Admin | Updated: March 15, 2015 01:16 IST2015-03-15T01:16:21+5:302015-03-15T01:16:21+5:30
आघाडी सरकारच्या काळातील एका योजनेच्या नावात फेरफार करत भाजपा सरकारने ती योजना ढापल्याचे समोर आले आहे.

गावाच्या जागी केले शिवार!
अतुल कुलकर्णी ल्ल मुंबई
आघाडी सरकारच्या काळातील एका योजनेच्या नावात फेरफार करत भाजपा सरकारने ती योजना ढापल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात ‘जलयुक्त शिवार अभियान’ नावाचा कार्यक्रम घोषित केला होता. हा नवा कार्यक्रम असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र हाती आलेल्या कागदपत्रातून फक्त गावाच्या जागी ‘शिवार’ शब्द टाकून ही योजना पुन्हा कार्यान्वित केली गेली आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणात ‘हा एक नवीन कार्यक्रम घोषित केला आहे’ असे म्हटले आहे. ३ डिसेंबर २०१४ रोजी अवर सचिव ना. श्री. कराड यांनी ग्राम विकास व जलसंधारण विभागाची एक नोट तयार केली होती; ज्यावर उपसचिवापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी सह्णा केल्या होत्या. त्यात म्हटले होते की, सन २०१२-१३ मध्ये दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पुणे विभागातील ५ जिल्ह्णात ‘जलयुक्त गाव अभियान ’हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात सर्व विभागाच्या समन्वयातून एकत्रितपणे वेगवेगळ्या योजना राबवून पाणी अडविण्यासाठी व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कृती आराखडा करण्यात आला.
यात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने सिमेंट नाले, केटीवेअर दुरुस्ती व नुतनीकरण, जलस्त्रोतातील गाळ गाढणे आदी कामे केली गेली. या विविध कामाच्या माध्यमातून ८.४० टीएमसी क्षमतेचे विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करण्यात आले. त्यामुळे भूजल पातळीत २ ते ३ मिटरने वाढ झाली व पिण्याचे आणि शेतीसाठी संरक्षीत सिंचनाची सोय झाली.’’
विशेष म्हणजे विविध विभागांतर्गत मंजूर असलेल्या योजनेच्या मंजूर निधीतून, आमदार, खासदार निधी, जिल्हास्तर निधी, अशासकीय संस्था, लोकसहभाग यांच्या माध्यमातून दुष्काळ
सदृष्य परिस्थितीवर कायम स्वरुपी मात करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची
मान्यता या फाईलवर सही करणाऱ्या सगळ्यांनी दिली. असे असताना ही योजना आम्हीच आणली, असा दावा भाजपा सरकारने का केला? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.