दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड!
By Admin | Updated: October 19, 2014 00:58 IST2014-10-19T00:58:50+5:302014-10-19T00:58:50+5:30
कपडय़ांपासून ते गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी कुटुंबासह रस्त्यावर उतरलेले मुंबईकर असे चित्र शनिवारी मुंबईत दिसून आले.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड!
मुंबई : आकाश कंदील, रंगीबेरंगी दिव्यांची लुकलुकती तोरणो, फटाक्यांची दुकाने, दुकानांवर केलेली रोशणाई, कपडय़ांपासून ते गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी कुटुंबासह रस्त्यावर उतरलेले मुंबईकर असे चित्र शनिवारी मुंबईत दिसून आले.
मुंबईत क्रॉफर्ड मार्केटपासून सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. क्रॉफर्ड मार्केटच्या गल्ल्यांमध्ये झुंबड उडली आहे. मोहम्मद अली रोडवरील फटाके विक्रीच्या दुकानांत घाऊक दरात फटाके विकत घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. अनेक भागांत फूटपाथवर विक्रीला ठेवलेल्या कंदील व दिव्यांच्या तोरणांमुळे रस्ते झगमगून गेले आहेत. दुपारनंतर क्रॉफर्ड मार्केट, दादर टीटी, दादरचा रानडे रोड, माहीमचा लेडी जमशेटजी रोड, स्वामी विवेकानंद रोडवर वाहतुकीची काहीशी कोंडी झाली होती. दादरला खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती.
धनत्रयोदशी अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्यामुळे सोने विकत घेण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानांतही गर्दी झाली होती. नोकरदार महिलांना घरात फराळ तयार करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने चिवडा, लाडू, चकली विक्रीच्या दुकानांमध्ये रेडीमेड खरेदीसाठी महिलावर्गाचा ओढा दिसून आला. (प्रतिनिधी)
ऑनलाइन
शॉपिंगलाही पसंती!
च्भरभरून मिळत असलेल्या सवलतींमुळे ऑनलाइन खरेदीचा कल वाढत आहे. ऑनलाइन शॉपिंग करण्यात तरुणाईचा ओढा अधिक असून,
सणासुदीच्या काळात या पर्यायाकडेही आता ग्राहकवर्ग वळताना दिसून येतो आहे.
मॉल्सही हाऊसफुल्ल!
च्एकापेक्षा अधिक ब्रॅण्ड एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे मुंबई शहर-उपनगरातील सर्वच मॉल्समध्ये दिवसभर गर्दी दिसून आली. बहुतेक मुंबईकरांच्या हाती दिवाळीचा बोनसही पडल्यामुळे खरेदीला उधाण आल्याचे दिसून आले. मॉल्सकडून ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी आयोजित केलेले शॉपिंग कार्निव्हल
यामुळे खरेदीची रंगत वाढली असून, ग्राहकांची झुंबड
उडाल्याचे चित्र होते.