लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या अंगणातच ‘यंदा महापौर शिवसेनेचाच’ असा मजकूर लिहिलेला भला मोठा बॅनर लावल्याने त्याची चर्चा मुंबईत होत आहे. बॅनरद्वारे ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला असला तरी यावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महायुती सरकारमध्ये भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी असे तीन प्रमुख पक्ष आहेत. मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार असे खुद्द एकनाथ शिंदे हेदेखील उघडपणे बोलत नाहीत. मात्र या बॅनरवर महापौर महायुतीचा होणार, असे न लिहिता ‘शिवसेनेचाच होणार’ असा उल्लेख केल्याने भाजप आणि राष्ट्रवादीच्या नाराजीला आमंत्रणच मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात
बॅनरवर मजकूर कोणता?कलानगरजवळ उड्डाणपुलावर साधारण ३५-४० फूट लांबीचा हा बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर उजव्या बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत. तर मध्यभागी एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि डाव्या कोपऱ्यात खा. श्रीकांत शिंदे आदींची छायाचित्रे आहेत. बॅनरवर दीपावलीच्या शुभेच्छा देणारा एक संदेश असून, त्यासोबत ‘यंदा महापौर शिवसेनेचाच’ हा मजकूर ठळकपणे आहे.
Web Summary : A banner by Shinde Sena near Uddhav Thackeray's residence declaring 'Mayor will be from Shiv Sena' has stirred controversy. This move, perceived as taunting Thackeray, risks friction within the ruling coalition of BJP, Shinde Sena, and NCP, as it seemingly excludes other alliance partners from the mayoral post.
Web Summary : उद्धव ठाकरे के आवास के पास शिंदे सेना द्वारा 'महापौर शिवसेना से होगा' का बैनर लगाने से विवाद उत्पन्न हो गया है। ठाकरे को ताना मारने के रूप में देखे जाने वाले इस कदम से भाजपा, शिंदे सेना और एनसीपी के सत्तारूढ़ गठबंधन में घर्षण का खतरा है, क्योंकि यह महापौर पद से अन्य गठबंधन सहयोगियों को बाहर करता प्रतीत होता है।