पतीच्या उद्योगांमुळे शिल्पा शेट्टी अडचणीत; मीम्सचा पाऊस, पोर्नोग्राफी प्रकरणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग

By अबोली कुलकर्णी | Published: July 23, 2021 08:02 AM2021-07-23T08:02:53+5:302021-07-23T08:03:39+5:30

ट्विटरवरही नेटकरी शिल्पा शेट्टीला ट्रोल करत असून मीम्सचाही अक्षरशः पाऊस पडत आहे.

shilpa shetty in trouble due to raj kundra porn case issue | पतीच्या उद्योगांमुळे शिल्पा शेट्टी अडचणीत; मीम्सचा पाऊस, पोर्नोग्राफी प्रकरणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग

पतीच्या उद्योगांमुळे शिल्पा शेट्टी अडचणीत; मीम्सचा पाऊस, पोर्नोग्राफी प्रकरणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग

googlenewsNext

अबोली कुलकर्णी-शेलदरकर

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक केल्याने बॉलिवूड ढवळून निघाले आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणावरून प्रतिक्रिया उमटत असून शिल्पा शेट्टी ट्रेंडिंग आहे. ट्विटरवरही नेटकरी शिल्पा शेट्टीला ट्रोल करत असून मीम्सचाही अक्षरशः पाऊस पडत आहे.

‘राज कुंद्रा म्हणतो - नाही,  मी निर्दोष आहे’, असे एका नेटकऱ्याने पोस्ट केले आहे. तर शिल्पासाठी बागबान या चित्रपटातील ‘आप तो झूठ भी नही बोल पाते’ हा डायलॉग शेअर केला आहे.  ‘बिचारी शिल्पा योगामध्ये व्यस्त होती आणि राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवत राहिला ! राजसाहेब काही दिवस तुरुंगात घालवतील!’, असे एकाने म्हटले आहे.  तिसरा नेटकरी म्हणतो, ‘राज कुंद्राने पोर्नहब बरोबर करार केला असावा.’

शिल्पाच्या जागी करिश्मा

शिल्पाचा ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ हा शो चांगला गाजत आहे. दिग्दर्शक अनुराग बासू, नृत्य दिग्दर्शक गीता कपूर आणि शिल्पा शेट्टी हे तिघे या डान्स रिॲलिटी शोचे जज आहेत. मात्र, मंगळवारी शिल्पा या शोच्या शूटसाठी आली नसल्याची माहिती आहे.  शिल्पाच्या जागी आता करिश्मा कपूर या रिॲलिटी शोच्या जजची खुर्ची सांभाळणार आहे.

‘द कपिल शर्मा’ शोमधील कपिलने राजला त्याच्या उत्पन्नाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या शोमध्ये शिल्पाने राज कुंद्रा आणि बहीण शमितासोबत हजेरी लावली होती. यात कपिल राजला म्हणतो,  तुम्ही कधी सेलिब्रिटींसोबत फुटबॉल मॅच खेळताना दिसतात, कधी फ्लाइटमध्ये, कधी शिल्पासोबत शॉपिंग करताना दिसतात; पण तुम्ही पैसे कसे कमावता.” कपिलच्या या प्रश्नानंतर शोमध्ये एकच हशा पिकला होता.

शिल्पाचे करिअरच पणाला

- ‘हंगामा-२’ या सिनेमातून शिल्पा तब्बल १४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज होती. ती ‘निकम्मा’मधूनही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार होती. मात्र, राज कुंद्रामुळे शिल्पाच्या दोन्ही सिनेमांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. २००३ सालात आलेल्या ‘हंगामा’ सिनेमाचा ‘हंगामा-२’ हा सिक्वेल २३ जुलैला रिलीज होणार होता.
 

Web Title: shilpa shetty in trouble due to raj kundra porn case issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.