शेकाप नगरसेविकेच्या पतीला अटक

By Admin | Updated: September 6, 2014 02:34 IST2014-09-06T02:34:56+5:302014-09-06T02:34:56+5:30

शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई महापालिकेतील एकमेव नगरसेविका खैरोनिसा अकबर हुसेन यांचा पती अकबर शफी हुसेन उर्फ राजूभाई उर्फ राजू बाटला याला उरण पोलिसांनी अटक केली आहे.

Shekap corporator's husband arrested | शेकाप नगरसेविकेच्या पतीला अटक

शेकाप नगरसेविकेच्या पतीला अटक

अजित पाटील ल्ल चिरनेर
चोरीच्या कंटेनरवर कस्टमने पूर्वी ठेवलेल्या रक्तचंदनाच्या कंटेनरचा नंबर पेंट करून रक्तचंदनाने भरलेला कंटेनर चोरल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई महापालिकेतील  एकमेव नगरसेविका खैरोनिसा अकबर हुसेन यांचा पती अकबर शफी हुसेन उर्फ राजूभाई उर्फ राजू बाटला याला उरण पोलिसांनी अटक केली आहे.  त्याच्यासोबत प्रताप धायगुडे आणि डीआरटी प्रकल्प असलेला रक्तचंदनाचा कंटेनर बाहेर काढण्यात मदत करणा:या आणखी तिघांनाही अटक करण्यात आली. उरण न्यायालयाने त्यांना शनिवार्पयत कोठडी सुनावली आहे.
परदेशात कोटय़वधींची किंमत असणा:या रक्तचंदनाचे दोन कंटेनर जेएनपीटी बंदरातून कस्टमने सुमारे वर्षभरापूर्वी पकडले ते पागोटेजवळील डीआरटी गोदामामध्ये 2क्13पासून ठेवण्यात आले होते. या रक्तचंदन ठेवलेल्या कंटेनरचा नंबर दुस:याच एका रिकाम्या चोरीच्या कंटेनरवर प्रिंट करून तो कंटेनर रक्तचंदन भरलेल्या कंटेनरच्या जागी ठेवून ज्यात रक्तचंदन होते तो खरा कंटेनरच या चोरांनी गायब केला. उरण पोलिसांकडील चोरीला गेलेल्या रिकाम्या कंटेनरच्या तक्रारीवर तपास करताना गुन्ह्याची उकल झाली.
 
च्या प्रकरणात ज्यांनी चोरीच्या कंटेनरवर कस्टमच्या अखत्यारीतील कंटेनरचा नंबर छापून दिल्याबाबत साईनाथ पाटील आणि स्वप्नील पाटीलला प्रताप धायगुडेने 5क् लाख दिले.
च्अकबर हुसेनवर यापूर्वी अनेक गुन्हे व तडीपारीची कारवाई केली होती. शेकापने त्याला विधानसभेची उमेदवारी दिली आहे.

 

Web Title: Shekap corporator's husband arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.