कळव्याचा गिरीष शेट्टी ठाणे महापौर श्री

By Admin | Updated: February 2, 2015 22:55 IST2015-02-02T22:55:48+5:302015-02-02T22:55:48+5:30

१७ वी ठाणे महापौर (२०१४-१५) ठाणे जिल्हा क्षेत्र हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेचा किताब विजेता कळवा, अपोलो जिमचा गिरीष कांताप्पा शेट्टी हा ठरला.

Shehati Thane Mayor Shri | कळव्याचा गिरीष शेट्टी ठाणे महापौर श्री

कळव्याचा गिरीष शेट्टी ठाणे महापौर श्री

ठाणे: १७ वी ठाणे महापौर (२०१४-१५) ठाणे जिल्हा क्षेत्र हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेचा किताब विजेता कळवा, अपोलो जिमचा गिरीष कांताप्पा शेट्टी हा ठरला. सांघिक विजेतेपद ही अ‍ॅपोलो जिम कळवा, तर सांघिक उपविजेतेपद श्री मावळी मंडळ ठाणे यांनी पटकाविले.
ही स्पर्धा गोदूताई परूळेकर उद्यान सिध्देश्वर तलाव चंदनवाडी येथे पार पडली. विजेत्या स्पर्धेकांना सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी ठाण्याचे महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, माजी महापौर अशोक वैती आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

गटनिहाय निकाल
४सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक विजेता- संतोष लक्ष्मण पाटील, अ‍ॅपोलो जिम कळवा
उपविजेता पहिला कार्तिककुमार नायडू, लॉरेन्स हेल्थ क्लब
उपविजेता दुसरा गिरीष कांताप्पा शेट्टी, अपोलो जिम कळवा
उपविजेता तिसरा रु पेश सुभाष चव्हाण, स्फूर्ती व्यायामशाळा
४गट १ शॉर्ट गुप
राजीव रमेश जैना,
रु पेश चव्हाण, आशीष महाले, प्रसाद झगडे, फैझान खान, बाळु तुपे, अक्षय भोईर.
४गट २ रा मिडीयम ग्रुप
वाजिद खान, संतोष पाटील, इजहार अहमद मुस्तार अहमद अन्सारी, पंडित पाटील, निलेश दवणे, महेश नागुला, भरत शिंदे.
४गट ३ रा टॉल ग्रुप
गिरीष शेट्टी, संजय आंबेरकर, हरिहर शाहू, पराग माने, महेश खरटमल, जतीन दवे, प्रथमेश मोरे.
४गट ४ सुपर टॉल ग्रुप
प्रकाश मोरे, कार्तिक नायडू, मिलिंद तरणे, राजेंद्रनाथ सुरेश ठाकूर, संतोष चिंचावडे, राहूल क्षेत्रे, मनिष म्हात्रे.

Web Title: Shehati Thane Mayor Shri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.