शीना हत्याकांड : खन्नाला न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: September 9, 2015 01:16 IST2015-09-09T01:16:47+5:302015-09-09T01:16:47+5:30
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील आरोपी संजीव खन्ना याची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या खन्नाला दुपारी वांद्रे

शीना हत्याकांड : खन्नाला न्यायालयीन कोठडी
मुंबई: बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील आरोपी संजीव खन्ना याची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या खन्नाला दुपारी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
या हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा चालक श्याम राय यांना याआधी न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. खन्नाला पोलिसांनी तपासासाठी त्याच्या कोलकत्त्यातील निवासस्थानी नेले होते. या ठिकाणी हत्येवेळी त्याने वापरलेले बुट
तसेच शीनाचे दागिने जप्त करण्यात आले.