Join us
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोरा हत्या प्रकरण, कोरोनाच्या भीतीने इंद्राणीची जामिनासाठी न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 04:59 IST

शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने विशेष सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.  

मुंबई : कारागृहात कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने विशेष सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.  इंद्राणी भायखळा कारागृहात आहे. आपल्याला अनेक व्याधी असल्याचे म्हणत तिने ४५ दिवसांचा तात्पुरता जामीन देण्याची विनंती केली. न्यायालयाने तपासयंत्रणेला २६ जूनपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. दरम्यान, इंद्राणीचा आधीचा पती संजीव खन्ना यानेही कोरोनाच्या भीतीने अंतरिम जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. बुधवारी न्यायालयाने तो फेटाळला.

टॅग्स :इंद्राणी मुखर्जी