‘ती’ दोन हेलिकॉप्टर तटरक्षकची
By Admin | Updated: November 14, 2016 03:45 IST2016-11-14T03:45:53+5:302016-11-14T03:45:53+5:30
१० नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बोर्डीच्या किनारपट्टीवर दोन हेलिकॉप्टर्स दिसली. त्यापैकी एक टप्याटप्याच्या अंतराने हवेत स्थिरावत होते

‘ती’ दोन हेलिकॉप्टर तटरक्षकची
डहाणू/बोर्डी : १० नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बोर्डीच्या किनारपट्टीवर दोन हेलिकॉप्टर्स दिसली. त्यापैकी एक टप्याटप्याच्या अंतराने हवेत स्थिरावत होते, तर दुसरे घिरट्या घालीत होते. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर, शुक्रवारी दुपारच्या वेळी पुन्हा दोन्ही हेलिकॉप्टर घोंघावताना दिसली. त्यामुळे लोकमतने पाठपुरावा केला असता घोलवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी ती तटरक्षक दलाची असून ती सुरक्षात्मक टेहळणी करीत आहेत, असे सांगितले. त्यामुळे जनतेतील संभ्रम दूर झाला. (वार्ताहर)