नवी विमानतळासाठी शेअर टिलचा उतारा
By Admin | Updated: December 8, 2014 22:33 IST2014-12-08T22:33:53+5:302014-12-08T22:33:53+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी निविदाकारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने शेअर टिल प्रणालीस मंजुरी दिली आहे.

नवी विमानतळासाठी शेअर टिलचा उतारा
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी निविदाकारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने शेअर टिल प्रणालीस मंजुरी दिली आहे. यामुळे ठेकेदारांना प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त विमानतळावरील बिगरहवाई महसुलामध्येही वाटा मिळणार आहे.
सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी फेब्रुवारी 2क्14 मध्ये पात्रता विनंती अर्ज मागविले होते. परंतु निविदेमधील काही अटींमुळे ठेकेदारांकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर संभाव्य निविदाकारांची बैठक सिडकोने एप्रिल 2क्14 मध्ये बोलावली होती. या बैठकीस टाटा रिअल्टी, जीएमआर, जीव्हीके, आयएल अँड एफएस, एस्सेल इन्फ्रा, फेरोव्हिअर, ङयुरीच एयरपोर्ट, विन्सी व इतर कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळापासून जवळच मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रवासी वाहतुकीसाठी दोन्ही विमानतळांमध्ये स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा निकोप होण्यासाठी विमानतळ शेअर टिल तत्त्वावर विकसित करण्यास अनुमती मागितली होती. जोर्पयत मुंबई व नवी मुंबईमधील विमानतळासाठी एकसारख्या नियंत्रण प्रणाली राबविल्या जाणार नाहीत तोर्पयत निविदाकारांकडून अपेक्षित प्रतिसाद प्राप्त होणार नाही हे स्पष्ट झाल्यामुळे राज्य शासनाने 15 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी शेअर टिलला परवानगी मिळावी अशी विनंती केंद्र शासनास केली होती. केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.
विमानतळ प्रकल्पातील शेअर टिल (उत्पन्न स्रोताचा सहभाग विकासकाला देणो) तत्त्वास परवानगी मिळाल्यामुळे विमानतळाच्या निविदा प्रक्रियेस गती मिळणार आहे. निविदाकारांना अर्ज भरण्यासाठी 28 जानेवारी 2क्15 ची शेवटची मुदत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
जागतिक स्तरावरील
टिल प्रणाली
4जागतिक स्तरावर मोठय़ा प्रकल्पांसाठी सद्यस्थितीमध्ये सिंगल टिल, डय़ुल टिल, शेअर टिल यासारख्या व्यवस्थापन प्रणाली अमलात आणल्या जात आहेत. सिंगल टिल प्रणालीमध्ये हवाई महसूल तसेच बिगरहवाई महसूल यांचा वापर प्रकल्पखर्चाच्या अनुदानासाठी केला जातो. डय़ुल टिल प्रणालीमध्ये बिगरहवाई महसूल हा संपूर्ण वेगळा ठेवला जातो. शेअर टिल प्रणालीमध्ये महसुलातील काही वाटा प्रकल्पखर्चाच्या अनुदानासाठी वापरला जातो. शेअर टिल ही प्रणाली अमलात आणण्यास आजकाल प्राधान्य दिले जात आहे.