Join us  

'मी ह्रदयात मग गेला कशाला?' गयारामांना शरद पवारांचा भावनिक 'टोला' 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 10:17 AM

राज्यातील पवारांच्या दौऱ्यात त्यांना मिळत असलेला प्रतिसाद, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ऊर्जा निर्माण करत आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालना जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा होत आहे. सोलापूर येथून सुरू झालेला शरद पवारांचा दौरा मराठवाड्यातील वसमतनंतर जालन्यात पोहोचला. मी पायाला भिंगरी लावून फिरणार आहे, पक्षातून गेलेल्यांना घरी बसवणारच, असा प्रणच पवार यांनी लातूर येथील सभेत बोलून दाखवला आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद येथे गयाराम नेत्यांवर टीपण्णी केल्यानंतर पुन्हा एकदा वसमत जिल्ह्यात पवारांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांना टोला लगावला 

राज्यातील पवारांच्या दौऱ्यात त्यांना मिळत असलेला प्रतिसाद, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ऊर्जा निर्माण करत आहे. तर, तरुण कार्यकर्त्यांची पवारांच्या दौऱ्याला मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे, पवारांमध्येही निवडणुकांच्या अनुषंगाने उत्स्फुर्त वातावरण दिसून येतंय. सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीला रामराम करुन शिवसेना आणि भाजपात गेले आहेत. तर, अद्यापही काहीजण पक्षांतराच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना पवारांनी चांगलाच टोला लगवला. 

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, उदयनराजे भोसेल, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री दिलीप सोपल, उस्मानाबादचे राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री सचिन अहिर, शिवेंद्रसिंह राजे यांच्यासह अनेकांनी पक्षांतर केले आहे. या पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर पवार यांच्याबद्दल कुठलिही तक्रार नसल्याचं म्हटलंय. तसेच, अनेकांनी पवारसाहेब हे माझ्या ह्रदयात आहेत, ते कायम राहतील, असेही अनेकांनी म्हटलंय. मात्र, पक्षांतर करणाऱ्या या नेत्यांना पवार आपल्या सभेतून उत्तर देत आहे. गुरुवारी वसमत येथेही पवारांनी गयारामांना वार केला. ''अनेक लोक आम्हाला सोडून विरोधी विचारांच्या पक्षात जात आहेत. मला अशा लोकांची काहीच चिंता नाही. ते जाताना सांगतात की पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. तुझ्या हृदयात जर पवार साहेब मग गेला कशाला?'' असे म्हणत पवारांनी गयारामांना चांगलाचा टोला लगावला. 

 

टॅग्स :शरद पवारमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसपरभणी