Join us  

शरद पवार आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:16 AM

१० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

मुंबई : ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. ९ जूनला रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

९ जून रोजी सकाळी ११. ३० वाजता माणगाव, १२.३० वाजता म्हसळा, १ वाजता दिवेआगार, २ वाजता श्रीवर्धन, ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक, सायंकाळी हरिहरेश्वर आणि नंतर दापोलीकडे रवाना होणार आहेत. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.१० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस