Join us

Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर आज ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 07:02 IST

Sharad Pawar : काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डाॅक्टरांनी सात दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पित्ताशयावर सोमवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डाॅक्टरांनी सात दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. १५ दिवसांनंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती.  त्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, साेमवारी त्यांच्या  पित्ताशयावर शस्त्रक्रिया हाेणार आहे.

टॅग्स :शरद पवारहॉस्पिटल