Join us

शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 03:41 IST

महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती व्हावी, अशी इच्छाही आठवले यांनी व्यक्त केली.

मुंबई : शिवसेनेला पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीच फायदा नाही. त्यामुळे शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती व्हावी, अशी इच्छाही आठवले यांनी व्यक्त केली.

पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत कर्तव्यदक्ष नेते आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर विविध प्रश्नांची जाणीव असलेले जाणकार नेते आहेत. त्यामुळे त्यांनी एनडीएसोबत यायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी काम करावे. त्यांच्या अनुभवाचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा होईल, असे आठवले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :रामदास आठवलेशरद पवार