Join us  

शरद पवार साहेबांच्या प्रयत्नांना यश, केंद्र सरकार कांदा निर्यातबंदी उठवणार - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 1:13 AM

केंद्र सरकार कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत असून, लवकरच कांदा निर्यात खुली होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ दिली आहे.

मुंबई :- माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या मध्यस्तीनंतर केंद्र सरकार कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत असून, लवकरच कांदा निर्यात खुली होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ दिली आहे.

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्रेक करत आंदोलन उभे केले होते. याबाबत ना. छगन भुजबळ यांनी तातडीने माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार साहेब यांना माहिती देऊन त्यांच्याकडे केंद्र सरकारकडे मध्यस्ती करत कांदा निर्यात खुली करण्याची मागणी केली होती. तसेच कांदा निर्यात खुली होईपर्यंत शेतकऱ्यांनी शांतता व संयम ठेवावा असे आवाहन ना. भुजबळ यांनी आज शेतकऱ्यांना केले होते.

 केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी निर्णय मागे घेतला जात नसल्याने कांद्याच्या भावात घसरण सुरू होती. परिणामी शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बंद पाडले होते. याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर खासदार पवार यांनी तातडीने केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली.चर्चेनुसार कांदा निर्यात बंदी लवकरच उठवण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :छगन भुजबळ