Join us

तर राजू शेट्टी राष्ट्रवादीकडून आमदार होणार, शरद पवारांचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 08:01 IST

राष्ट्रवादीचा कोटा : शरद पवार यांचा आग्रह

विश्वास पाटील ।

कोल्हापूर : विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांना आॅफर आली आहे. त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: शिरोळला येऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा निरोप देऊन गेले आहेत.

ही आॅफर स्वीकारून स्वत: शेट्टी हे विधानपरिषदेवर जाणार की अन्य कुणाला संधी देणार, याबाबतचा निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीकडून मात्र ही आॅफर देताना या जागेवर शेट्टी यांनीच जावे, अशी अट घातली आहे. शेट्टी नसतील तर संघटनेकडे अनिल मादनाईक, प्रा.जालंदर पाटील, रविकांत तूपकर ही पर्यायी नावे आहेत. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त एकूण १२ जागा भरायच्या आहेत. त्यातील किमान चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकतात. शेट्टी यांच्यासारखा लढाऊ नेता विधानपरिषदेत जावा अशी स्वत: शरद पवार यांचीच भूमिका असल्याचे पाटील यांनीही स्पष्ट केले आहे.

टॅग्स :शरद पवारराजू शेट्टी