Join us  

Sharad Pawar in Hospital: शरद पवारांचे सर्वच दौरे 2 आठवड्यांसाठी रद्द, सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 12:50 PM

शरद पवार यांना रविवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची तपासणी करण्यात आली. पुढील उपचारासाठी ३१ मार्च रोजी त्यांना रुग्णालय दाखल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबाबांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 31 मार्चपासून पुढील 10 दिवस ते रुग्णालयातच उपचार घेणार आहेत, त्यानंतर आराम करण्यासाठी काही दिवस घरीच विश्रांती घेतील.

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रविवारी संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखल्यामुळे थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. निदान झाल्यानंतर, त्यांच्या पित्ताशयामध्ये एक समस्या असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. तर, दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वडिल शरद पवारा यांचे पुढील 15 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले. 

शरद पवार यांना रविवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची तपासणी करण्यात आली. पुढील उपचारासाठी ३१ मार्च रोजी त्यांना रुग्णालय दाखल करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर कुठलीही औषधे न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. एन्डोस्कोपीनंतर त्यांच्यावरआवश्यक त्या सर्जरी करण्यात येतील. तोपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर, सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअप स्टेट्सद्वारे माहिती दिली आहे.  

बाबांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 31 मार्चपासून पुढील 10 दिवस ते रुग्णालयातच उपचार घेणार आहेत, त्यानंतर आराम करण्यासाठी काही दिवस घरीच विश्रांती घेतील. त्यामुळे, त्यांचे नियोजित दौरे आणि विमानप्रवास सर्वकाही पुढील दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. आपल्या व्हॉट्सअपला स्टेट्स ठेऊन सुळे यांनी आपण सर्वजण समजून घेताल, त्याबद्दल आपले आभार, असेही म्हटलंय. 

पश्चिम बंगालमधील दौराही रद्द

पश्चिम बंगाल आणि केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे दौरे नियोजित होते. परंतु आता हे दौरे रद्द करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान नुकतंच पार पडलं. १ एप्रिल पासून शरद पवार हे तीन दिवसांकरिका पश्चिम बंगालमध्ये प्रचासाठी जाणार होते. यापूर्वी काँग्रेसनं शरद पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसाठी प्रचार करू नये अशी विनंती केली होती. परंतु काँग्रेसची विनंती फेटाळत त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.   

टॅग्स :सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारमुंबई