‘शंन्ना’डे ला सलाम
By Admin | Updated: November 21, 2014 23:15 IST2014-11-21T23:15:08+5:302014-11-21T23:15:08+5:30
जीवनातील नाट्यमय, मानवी जीवनातील भावभावनांचा ठाव घेणारे रंजनपर लेखन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. तिळा तिळा दार उघड, बेला, शहाणी सकाळ, बिलोरी, मर्जिनाच्या फुल्या, कस्तुरी, पाऊस
‘शंन्ना’डे ला सलाम
अनिकेत घमंडी, डोंबिवली
सतत आपल्या लेखणीने मानवी मनाचा आणि दैनंदिन जीवनाचा वेध घेणा-या डोंबिवलीतील ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार, नाटककार शं.ना. नवरे यांचा शुक्रवारी जन्मदिवस. लेखनातून आनंद देणा-या आणि लुटता येईल तेवढी मजा लुटू देणा-या निखळ आणि स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन डोंबिवलीत महापालिका ग्रंथालयाने ‘शन्ना डे’ साजरा केला़
जीवनातील नाट्यमय, मानवी जीवनातील भावभावनांचा ठाव घेणारे रंजनपर लेखन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. तिळा तिळा दार उघड, बेला, शहाणी सकाळ, बिलोरी, मर्जिनाच्या फुल्या, कस्तुरी, पाऊस आदी कथासंग्रह प्रसिद्ध असल्याची माहिती महापालिकेचे ग्रंथपाल अनिल भालेराव यांनी सांगितले. आनंदाचं झाड या कादंबऱ्यांचे लेखन शिवाय चार एकांकिका, आकाशवाणीसाठी ययाती, उपहार, विप्रदास, महानंदा, आदी श्रुतिकांचे लेखन. अघळपघळ, आगबोटीची कुळकथा, निकोला टेस्लाचे चरित्र आदी पुस्तके त्यांनी लिहिली. या सर्व लेखनामध्ये जीवनाकडे डोळसपणे पाहून खेळकर शैलीत घेतलेला जीवनाचा वेध हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. निरीक्षणाला चिंतनाची जोड मिळाल्याने परिणामकारकता प्राप्त झाल्याचेही दिसून येते. अशा त्यांच्या लेखणीला डोंबिवलीकरांनी सॅल्यूट ठोकला़