शहापूर शिवसेनेत दुफळी

By Admin | Updated: January 13, 2015 00:44 IST2015-01-13T00:44:03+5:302015-01-13T00:44:03+5:30

विधानसभा निवडणूकीतल्या पराभवा नंतर सुरु असलेल्या आरोप , प्रत्यारोपांच्या शहापूर शिवसेनेतील शीतयुद्धाचा जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या झाल्या भडका उडाला आहे.

Shampoos divide into Shivsena | शहापूर शिवसेनेत दुफळी

शहापूर शिवसेनेत दुफळी

शहापूर : विधानसभा निवडणूकीतल्या पराभवा नंतर सुरु असलेल्या आरोप , प्रत्यारोपांच्या शहापूर शिवसेनेतील शीतयुद्धाचा जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या झाल्या भडका उडाला आहे.
तिकीट वाटपात माजी आमदार दौलत दरोडा समर्थकांची तालुका प्रमुख मारु ती धिर्डे, ग्रामीण उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे यांनी कोंडी केल्याने संतप्त झालेल्या माजी दरोडा यांनी उमेदवार निवड प्रक्रियेत सापत्न वागणूक दिली जात असल्याची कैफियत मातोश्री दरबारी मांडली असून तिकीट वाटपात आर्थिक देवघेव सुरु असल्याचा आरोप केला आहे. यामुळे शहापूर शिवसेनेतल्या दोन गटांतील छुपा विरोध चव्हाटयावर आला आहे. विधानसभा निवडणुकीत तालुका नेत्यांनी विरोधी प्रचार केल्यानेच पराभव पत्करावा लागला असा ठाम समज दरोडा यांचा आहे. पक्षांतर्गत विरोधाने विधानसभेतल्या नेतृत्वाची संधी गमावलेल्या या समजाला विरोधी पक्षांतील नेत्यांनीदेखील खात्रीशीर दुजोरा दिल्याने दोन गटातल्या विरोधाचा सूर आणखीनच वाढला आहे. दरोडा यांनी मातोश्रीचे दार ठोठावले आहे.

Web Title: Shampoos divide into Shivsena