Join us

हातभट्टीमुक्त गाव अभियान राबविणार : शंभूराज देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 07:04 IST

भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील हातभट्टीची दारू पूर्णपणे बंद करण्यासाठी हातभट्टीमुक्त गाव अभियान राबविण्याच्या सूचना विभागाला दिल्याची माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. कारवाई केल्यानंतरही हातभट्टी अथवा अवैध दारूविक्री करताना कुणी आढळल्यास एमपीडीएअंतर्गत कारवाई तसेच तडीपार करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.  

भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. हातभट्टीची दारू ही विषारी रसायन या संज्ञेत आणता येईल का हे तपासून घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

...अधिकाऱ्यांवर कारवाई  मुंबईत रात्री दहानंतर दारूची दुकाने बंद करण्याच्या सक्त सूचना दिल्या जातील. तीन वेळा असा प्रकार आढळला तर परवाना रद्द केला जाईल. अवैध दारू दुकाने आढळली तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईशंभूराज देसाई