शालिनी ठाकरे यांचा प्रचार दौरा सुरु
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:31+5:302014-10-04T22:55:31+5:30
फोटोसह....सुपरवोट

शालिनी ठाकरे यांचा प्रचार दौरा सुरु
फ टोसह....सुपरवोट...........................................शालिनी ठाकरे यांचा प्रचार दौरा सुरुमुंबई: दिंडोशी मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार शालिनी ठाकरे यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. शालिनी ठाकरे यांच्या रॅली आणि मेळाव्यांना मतदारसंघात चांगला पाठिंबा मिळत आहे. दिंडोशी मतदार संघात अनेक समस्या जनतेला भेडसावत आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी बांधिलकी ठेवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शालिनी ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात शालिनी यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह एकविरा देवीच्या दर्शनाने केली. यावेळी एकवीरा देवीच्या दर्शनावेळी सुमारे पाच हजार महिला शालिनी यांच्यासोबत होत्या. शालिनी यांच्यासाठी खास महिला प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विभागातील साडेतीन हजार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरे प्राजक्ता माळी आणि तन्वी पालव यांचाही या रॅलीत सहभाग होता. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडलेले विकासाचे व्हीजन अंमलात आणण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे शालिनी यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)