जोरदार सरींनी उपनगराला झोडपले!
By Admin | Updated: September 17, 2014 22:56 IST2014-09-17T22:56:48+5:302014-09-17T22:56:48+5:30
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत कडाक्याचे ऊन पडत असतानाच बुधवारी भल्या पहाटे पूर्व उपनगरांत बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या.

जोरदार सरींनी उपनगराला झोडपले!
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत कडाक्याचे ऊन पडत असतानाच बुधवारी भल्या पहाटे पूर्व उपनगरांत बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. तब्बल दीडएक तास कोसळलेल्या या सरींमुळे वातावरणात काहीसा गारवा आला होता.
गणोशोत्सवाच्या काळात कोसळलेल्या सरींनी आता विश्रंती घेतली आहे. अरबी समुद्रासह उत्तरेकडे आणि दक्षिणोकडे निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र विरुन गेले आहे. परिणामी पावसाचा जोर ओसरला आहे. पावसाची कुठे तरी एक हलकीशी सर पडत असून, मुंबई आणि उपनगराला दिवसभर उनाचा तडाखा बसतो. बुधवारी मात्र सकाळीच दाटून आलेले काळे कुट्ट ढग सोबत पाऊस घेऊन आले आणि पूर्व उपनगरात ठिकठिकाणी बरसलेल्या जोरदार सरींमुळे वातावरणात गारवा आला. सकाळी दहा वाजेर्पयत सुरूअसलेली पावसाची रिमङिाम नंतर मात्र थांबली आणि पुन्हा ऊन चाकरमान्यांना चटके देऊ लागले. (प्रतिनिधी)
च्पुढील 48 तासांत दक्षिण कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी; उत्तर कोकण आणि मराठवाडयात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
च्तर मुंबई शहरासह उपनगरात पावसाच्या एक-दोन सरी कोसळतील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 3क्, 27 अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.