मुंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शायना एनसी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2025 08:57 IST2025-11-13T08:52:08+5:302025-11-13T08:57:28+5:30
मुंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मुंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शायना एनसी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
मुंबई
मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक मुंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीचा सविस्तर अहवाल शायना एनसी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला. यावेळी विख्यात वास्तुविशारद आणि संवर्धन तज्ज्ञ आभा लांबा देखील उपस्थित होत्या.
मुंबादेवी मंदिर हे मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग असून आपला वारसा जपणे म्हणजे आपली ओळख जपण्यासारखं असल्याचं शायना एनसी म्हणाल्या. तसंच मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलेला हा प्रस्ताव वारसा संवर्धन, सुधारित सुलभता आणि परिसराचं सांस्कृतिक पुनरुज्जीवन यावर केंद्रित असल्याचंही त्यांनी सांगितलं.