शहापूरात पंचरंगी लढत

By Admin | Updated: September 27, 2014 00:28 IST2014-09-27T00:28:38+5:302014-09-27T00:28:38+5:30

युती आणि आघाडी तुटल्यानंतर शहापूर विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढतीचे ऐलान करण्यात आले आहे.

Shahpura Panchiranga fight | शहापूरात पंचरंगी लढत

शहापूरात पंचरंगी लढत

शहापूर : युती आणि आघाडी तुटल्यानंतर शहापूर विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढतीचे ऐलान करण्यात आले आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे लढतीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्य विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच शहापूरमधील मतदारांनादेखील या निवडणुकीच्या निमित्ताने पंचरंगी लढतीला सामोरे जावे लागत आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी राष्ट्रवादीतर्फेपांडुरंग बरोरा, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे भिकल तांडेल व अपक्ष हरिश्चंद्र खंडवी यांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरले. भाजपा, शिवसेना, मनसे, काँग्रेसतर्फे शनिवारी अर्ज दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेच्या मंजूषा जाधव यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केला आहे़ आज दिवसअखेरपर्यंत काँग्रेस व भाजपाच्या या मतदारसंघातील इच्छुकांना पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेकांनी प्रदेश कार्यालयातच ठिय्या मांडला आहे. भाजपाचे जि.प. सदस्य अशोक ईरनक यांचा तिकीट मिळवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. मात्र, येथून महिला उमेदवार देणार असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात येत आहे. मनसेने २००९ ला याच मतदारसंघातून पराभूत झालेले ज्ञानेश्वर तळपाडे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
२००४ मध्ये ते कुणबी सेनेच्या तिकिटावरही पराभूत झाले होते. एकदा शिवसेनेतर्फे व त्यानंतर गेली २५ वर्षे निवडणूक लढवूनही सातत्याने पराभूत झालेले पद्माकर केवारी यांचे नाव काँग्रेसने याही वेळी पुढे केले आहे. अंतर्गत विरोधाचा फटका येथे शिवसेना, राष्ट्रवादीला बसू लागला आहे. आज पांडुरंग बरोरा यांचा अर्ज भरताना राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष किसन भांडे, जि.प. सदस्य राजाराम वळवी, रंजना उघडा, पं.स. सदस्य समीर म्हात्रे यांची अनुपस्थिती गटबाजीचे दर्शन घडवत होती. दरम्यान, राष्ट्रवादीच्या जि.प. सदस्या रंजना उघडा यांना भाजपाचे वेध लागल्याचे भाजपाच्याच गोटातून सांगितले जात आहे.

Web Title: Shahpura Panchiranga fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.