शगुफ्ता खान हत्याकांड चोरीच्या उद्देशानेच
By Admin | Updated: November 14, 2014 01:29 IST2014-11-14T01:29:15+5:302014-11-14T01:29:15+5:30
बांग्लादेशात राहाणा:या प्रेयसीसोबत विवाह करून तेथेच स्थायिक होऊन एैश करावी या इराद्याने अरविंद गुप्ता उर्फ गुडडू या तरूणाने शगुफ्ता खान यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

शगुफ्ता खान हत्याकांड चोरीच्या उद्देशानेच
मुंबई : बांग्लादेशात राहाणा:या प्रेयसीसोबत विवाह करून तेथेच स्थायिक होऊन एैश करावी या इराद्याने अरविंद गुप्ता उर्फ गुडडू या तरूणाने शगुफ्ता खान यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्येनंतर खान यांच्या घरून तब्बल 7क् लाखांचे दागिने चोरून पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकावर उतरलेल्या गुडडूच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटने आवळल्या.
मालाड मार्वे रोड येथील रुस्तमजी रिवेरिया इमारतीत राहाणा:या खान (38) यांची 11 नोव्हेंबरला दुपारच्या वेळेत गुडडूने गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर गुडडूने घरात शोधाशोध केली. त्याच्या हाती सुमारे 7क् लाखांचे दागिने लागले. तोवर दुपारचे तीन वाजले होते. इतक्यात खान यांच्या दोन मुली घरी आल्या. त्यांना पाहून गुडडू घाबरला. हाती आलेला माल त्याने बॅगेत भरला आणि तो मुलींसमोरून घरातून पसार झाला. मुली घरात गेल्या तेव्हा त्यांनी खान यांना रक्ताच्या थारोळयात पाहिले.
गुडडू गोरेगाव येथील एका दुकानात मोबाईल रिपेरिंगचे काम करत होता. त्या दुकानाचा मालक सिराजचे खान यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे खान सिराजच्या दुकानावर येत असत किंवा काही कामानिमित्त सिराज खान यांच्या घरी जात असे. काहीवेळा सिराजसोबत गुडडूही असे. याच भेटीत गुडडूने खान यांचे घर पाहिले. घर आलिशान असल्याने खान यांच्याकडे भरपूर पैसे असतील याची कल्पना त्याला होती. त्यामुळेच बांग्लादेशी प्रेयसीसोबत लगA करून, बांग्लादेशात स्थायिक होण्यासाठी त्याने खान यांच्या हत्येचा कट रचल्याचे चौकशीतून समोर आली आहे.
गुडडूची प्रेयसी गोरेगावच्या बारमध्ये काम करत होती. तिच्यासोबत गुडडू बांग्लादेशची वारी करून आला होता. हत्येच्या दोन आठवडयांपुर्वी त्याने प्रेयसीला बांग्लादेशात धाडले होते. विशेष म्हणजे तीन महिन्यांपासून त्याने आपल्या नातेवाईकांशी संपर्क तोडला होता. हत्येनंतर नातेवाईकांना त्रस होऊ नये हाही त्यामागील हेतू होता, असा पोलिसांचा अंदाज आहे.
इमारतीत शिरताना व बाहेर पडताना गुडडू सीसीटीव्हीत कैद झाला होता. तसेच खान यांच्या मुली, इमारतीचा वॉचमन गुडडूला ओळखत होते. या गुन्ह्याचा समांतर तपास करणा:या कांदिवली युनीटचे वरिष्ठ निरिक्षक अविनाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील निरिक्षक चिमाजी आढाव, एपीआय शरद झीने, शिपाई दयानंद बुगडे या पथकाने गुडडूची इत्यंभूत माहिती काढली. बांग्लादेशला पसार होण्यासाठी तो प. बंगाल गाठेल या अंदाजाने हे पथक हावडा रेल्वे स्थानकात धडकले. तेथे पाळत सुरू असताना पहाटे सहाच्या सुमारास गुडडू रेल्वे स्थानकातून बाहेर पडता या पथकाला आढळला. (प्रतिनिधी)