मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी शिवसेना उबाठाच्या उदेश पाटेकर आणि मनसेच्या नयन कदम यांचा पराभव केला.
शिवसेनेसाठी ही जागा महत्त्वाची राहिली आहे. यापूर्वीही प्रकाश सुर्वे यांचा विजय झाला होता. पुन्हा एकदा त्यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली होती. शिवसेना उबाठा गटाकडून उदेश पाटेकर यांना तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नयन प्रदीप कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळीही यात प्रकाश सुर्वे यांनी बाजी मारली.
मागाठाणे हा मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. २०१९ मध्ये मगठाणे येथे ५९.५९ टक्के मतदान झालं होतं. २०१९ मध्ये प्रकाश सुर्वे यांनी शिवसेनेकडून विजय मिळवला होता. प्रकाश राजाराम सुर्वे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नयन प्रदीप कदम यांचा ४९ हजार १४६ मतांनी पराभव केला होता. यावेळीही नयन कदम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात होते.