तरुणींशी अश्लील चाळे
By Admin | Updated: February 22, 2015 22:27 IST2015-02-22T22:27:43+5:302015-02-22T22:27:43+5:30
मोबाइलवरून तरूणींशी अश्लील संभाषण करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. असाच प्रकार परिसरात घडल्याने परिसरात महिलावर्गात या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

तरुणींशी अश्लील चाळे
मोहोपाडा : मोबाइलवरून तरूणींशी अश्लील संभाषण करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. असाच प्रकार परिसरात घडल्याने परिसरात महिलावर्गात या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. रिस येथील दुर्गामाता कॉलनीत राहणाऱ्या अंकुश पवार (३७) याने एका तरूणीला नोकरीचे आमिष दाखवून अश्लीलपणा केला. या तरूणीने रसायनी पोलीस ठाण्यात पवार याच्याविरोधात तक्रार दाखल केली असता अंकुश पवार याला अटक केली. (वार्ताहर)