विद्यार्थिनीवर शाळेतच लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: January 10, 2016 04:45 IST2016-01-10T04:45:19+5:302016-01-10T04:45:19+5:30

दादर येथील एका नामांकित शाळेत पाचवीमध्ये शिकणाऱ्या ९वर्षीय विद्यार्थिनीवर २०वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली.

Sexual harassment at school | विद्यार्थिनीवर शाळेतच लैंगिक अत्याचार

विद्यार्थिनीवर शाळेतच लैंगिक अत्याचार

मुंबई : दादर येथील एका नामांकित शाळेत पाचवीमध्ये शिकणाऱ्या ९वर्षीय विद्यार्थिनीवर २०वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. सोमनाथ फेराई यादव असे आरोपीचे नाव असून, तो शाळेच्याच कॅन्टीनमध्ये काम करतो. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दादर रेल्वे स्थानकाजवळील असलेल्या एका नामांकित शाळेत शुक्रवारी वार्षिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान यादवने मुलीला बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा ती शाळेतील एका बाथरूममध्ये आढळली. घडला प्रकार मुलीने पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पास्को आणि बलात्काराच्या गुन्ह्यांत यादवला अटक केली.

Web Title: Sexual harassment at school