ठाण्यामध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: July 10, 2017 20:39 IST2017-07-10T20:39:02+5:302017-07-10T20:39:02+5:30

शीतपेयाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून अंबरनाथ येथील एका वीसवर्षीय तरुणीवर ठाण्याच्या चिरागनगर येथील...

Sexual harassment on the girl by giving a gunny drug in Thane | ठाण्यामध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

ठाण्यामध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 10 - शीतपेयाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून अंबरनाथ येथील एका वीस वर्षीय तरुणीवर ठाण्याच्या चिरागनगर येथील विशाल पवार (२५) याने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घोडबंदर रोडवरील एका मॉलमध्ये दोघेही नोकरीला असल्यामुळे त्यांची एकमेकांशी चांगली ओळख होती. सुरुवातीला ती त्याच्या घराशेजारीच वास्तव्याला होती. त्याने तिच्याशी सलगी वाढवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर ७ जुलै २०१६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिच्या चिरागनगर येथील घरी एका शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून तिला ते पिण्यासाठी दिले. गुंगी आल्यानंतर तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला. त्याच्यापासून सुटका होण्यासाठी तिने आपला पत्ताही बदलून अन्यत्र राहण्यास गेली. मात्र, या प्रकाराची मोबाइलमध्ये चित्रफीत घेऊन ही चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिला मारहाण करून पुन्हा घोडबंदर रोडवरील दोन वेगवेगळ्या लॉजमध्ये जबरदस्तीने नैसर्गिक तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. याबाबत, कोणालाही सांगितले तर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशीही त्याने धमकी दिली. या अत्याचाराचा कहर झाल्यानंतर तिने कंटाळून अखेर याप्रकरणी ८ जुलै २०१७ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. महिला पोलीस उपनिरीक्षक एस.आर. अडसुळे या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Sexual harassment on the girl by giving a gunny drug in Thane