चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: February 6, 2015 02:01 IST2015-02-06T02:01:31+5:302015-02-06T02:01:31+5:30

सार्वजनिक शौचालयात शौचासाठी गेलेल्या सात वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक संभोग करत त्याला तेथेच कोंडल्याची घटना गेल्या आठवड्यात विक्रोळीमध्ये घडली.

Sexual harassment at Chimudra | चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार

चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार

मुंबई: सार्वजनिक शौचालयात शौचासाठी गेलेल्या सात वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक संभोग करत त्याला तेथेच कोंडल्याची घटना गेल्या आठवड्यात विक्रोळीमध्ये घडली. या प्रकरणी विक्रोळी पार्क साईट परिसरात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनूने दिलेल्या माहितीवरून आरोपीचे रेखाचित्रही तयार करण्यात आले आहे.
विक्रोळी पार्क साईट परिसरात ७वर्षीय सोनू (नाव बदललेले आहे) आई-वडिलांसह राहतो. ३० जानेवारीला दुपारी मित्रांसोबत खेळत होता. तेथून तो शौचासाठी सार्वजनिक शौचालयात गेला. ही संधी साधत आरोपीही शौचालयात धडकला. ठार मारण्याची धमकी देत त्याने सोनूसोबत अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर सोनूला कोंडून आरोपीने पळ काढला. बराच वेळ होऊनही सोनू घरी परतला नाही म्हणून शोधार्थ आई घराबाहेर पडली. तेव्हा त्याचा शोध लागला. सोनूने आईला सगळे सांगितले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sexual harassment at Chimudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.