मुंबईत चिमुकलीची लैंगिक अत्याचार करुन हत्या
By Admin | Updated: September 18, 2016 17:18 IST2016-09-18T17:18:18+5:302016-09-18T17:18:18+5:30
मुंबईच्या मुलुंडमध्ये एका 7 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना

मुंबईत चिमुकलीची लैंगिक अत्याचार करुन हत्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.18- मुंबईच्या मुलुंडमध्ये एका 7 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलुंडमधील नवघर परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री घराबाहेर खेळत असताना अचानक ही चिमुरडी गायब झाली होती. कुटुंबियांनी आणि शेजारच्यांनी रात्रभर शोध घेतल्यानंतर एका ट्रक खाली चिमुरडी बेशुद्धावस्थेत सापडली. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यापुर्वीच तिचा मृत्यू झाला होता.