वडिलांकडूनच सुरु होते मुलीवर लैगिक अत्याचार; वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल

By मनीषा म्हात्रे | Updated: November 5, 2023 18:33 IST2023-11-05T18:33:30+5:302023-11-05T18:33:57+5:30

याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे.

Sexual abuse of a girl starts from the father; | वडिलांकडूनच सुरु होते मुलीवर लैगिक अत्याचार; वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल

वडिलांकडूनच सुरु होते मुलीवर लैगिक अत्याचार; वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : गोवंडीत वडिलांकडूनच अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून लैगिक अत्याचार सुरु असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे.

गोवंडीत १३ वर्षीय मुलगी कुटुंबियांसोबत राहते. घरात एकटी असताना वडिलांचीच वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने तिच्यावर लैगिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली. गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार सुरु होते.

अखेर, नराधम वडिलांचे अत्याचार वाढताच त्याने नातेवाईकांकडे याबाबत वाचा फोडली. याप्रकरणी पोक्सो, लैगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करत आहे. 

Web Title: Sexual abuse of a girl starts from the father;