वडील, भावाकडूनच सुरू होते अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST2020-12-05T04:09:23+5:302020-12-05T04:09:23+5:30
दोन वर्षांनी प्रकरण उघड : बापाला अटक, भावाचा शोध सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आई आजारी असल्याने घरात ...

वडील, भावाकडूनच सुरू होते अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
दोन वर्षांनी प्रकरण उघड : बापाला अटक, भावाचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आई आजारी असल्याने घरात असलेल्या १४ वर्षांच्या मुलीवर वडिलांची आणि भावाचीच वाईट नजर पडली. गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू होते. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिसांनी पॉक्सोचा गुन्हा नोंद करत बापाला अटक केली असून पसार भावाचा शोध सुरू आहे.
वडाळा परिसरात तक्रारदार १४ वर्षांची नेहा (नावात बदल) आई, वडील आणि भावासोबत राहते. आई आजारी असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. नेहा घरात एकटी असल्याने वडील आणि भावाची वाईट नजर तिच्यावर पडली. दोघेही २०१८ पासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. याबाबत कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी त्यांनी दिली हाेती.
अखेर दोन वर्षांनी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच, पोलिसांनी नेहाला विश्वासात घेत तिचे समुपदेशन केले. तिला बालगृहात ठेवले आहे. तिच्या तक्रारीवरून वडील आणि भावाविरुद्ध पॉक्सो, विनयभंग, धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. ४५ वर्षीय वडिलांना अटक करण्यात आली. भाऊ उत्तर प्रदेश येथे पळून गेला असून त्याचाही शोध सुरू आहे.
.....