अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: December 11, 2014 01:01 IST2014-12-11T01:01:42+5:302014-12-11T01:01:42+5:30
मालाड परिसरात एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने एका 12 वर्षाच्या गतीमंद मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
मुंबई: मालाड परिसरात एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने एका 12 वर्षाच्या गतीमंद मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मंगळवारी संध्याकाळी पीडीत मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपी मुलाने त्याला एका निर्जनस्थळी नेले. तिथे त्याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडीत मुलगा रडू लागताच आरोपी मुलाने तेथून पळ काढला. मुलगा रडतरडत घरी आला आणि त्याने आईला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर मुलाच्या आईने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी मुलगा हा पीडीत मुलाच्या शेजारी राहत असून बारावीत शिकत आहे. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी 17 वर्षीय मुलाला मंगळवारी रात्री अटक करुन बालसुधारगृहात
पाठविले. (प्रतिनिधी)