मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट

By Admin | Updated: February 8, 2016 02:58 IST2016-02-08T02:58:58+5:302016-02-08T02:58:58+5:30

स्पा-मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चेंबूर पोलिसांनी शनिवारी रात्री उद्ध्वस्त केले. या कारवाईतून पोलिसांनी ६ विदेशी तरुणींसह एका भारतीय मुलीची सुटका केली.

Sex racket under the name of massage parlor | मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट

मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट

मुंबई : स्पा-मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चेंबूर पोलिसांनी शनिवारी रात्री उद्ध्वस्त केले. या कारवाईतून पोलिसांनी ६ विदेशी तरुणींसह एका भारतीय मुलीची सुटका केली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
चेंबूरच्या सेंट्रल अविनी रोडवरील डायमंड गार्डन परिसरात असलेल्या तंत्र थाई स्पामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती चेंबूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. डाळ यांच्या नेतृत्वातील सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने याची खात्री पटवल्यानंतर शनिवारी रात्री ११च्या सुमारास या मसाज पार्लवर छापा टाकला. मसाज पार्लरमध्ये काम करीत असलेल्या ६ विदेशी तरुणींसह एका भारतीय मुलीची सुटका केली आणि मॅनेजरसह दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
स्पा-मसाज पार्लरच्या नावाखाली अवैधरीत्या सुरू असलेल्या या सेक्स रॅकेटविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी रिषी सेवाराम गलरानी, प्रतीक नंदलाल वैश आणि महिला दलाल अ‍ॅल्वीन जोसेफ अ‍ॅले्नस यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने कोठडी सुनावली असून, सुटका केलेल्या तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आल्याचे चेंबूर पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तंत्र थाई स्पा या हायप्रोफाईल मसाज पार्लरच्या देशभरामध्ये सुमारे ४० शाखा आहेत. या पार्लरच्या माध्यमातून थायलंडमार्गे तरुणींना भारतात आणले जाते. त्यांच्याकडून मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती चेंबूर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Sex racket under the name of massage parlor