Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ घरातूनच चालवायची सेक्स रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 06:12 IST

नवी मुंबईची गृहिणी घरातूनच सेक्स रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समाजसेवा शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आली आहे.

- मनीषा म्हात्रे मुंबई : नवी मुंबईची गृहिणी घरातूनच सेक्स रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समाजसेवा शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. दादरमध्ये एका अल्पवयीन मुलीचा अवघ्या १० हजार रुपयांत सौदा करताना ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली. शुभा राजेश पोवळे (२९) असे गृहिणीचे नाव असून, तिच्यासह रिक्षाचालक मौसीन नसीर शेख (३३) यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.दादर पूर्वेकडील अप्सरा लॉजमध्ये एका अल्पवयीन मुलीचा सौदा होणार असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार, समाजसेवा शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रभा राऊळ यांच्या पथकाने तेथे सापळा रचला. अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तेथे एका ग्राहकाकडे तिचा १० हजार रुपयांत सौदा होणार होता. त्यापूर्वीच समाजसेवा शाखेने तिची सुटका केली. या प्रकरणी कारवाईसाठी गेलेले समाजसेवा शाखेचे बाळकृष्ण ब्रीद यांच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोघांना अटक केली. पुढील तपासासाठी दोघेही समाजसेवा शाखेच्या ताब्यात आहेत. त्यांना न्यायालयाने १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सुटका करण्यात आलेली मुलीला मुंबई बाहेरून आणण्यात आले होते. तिच्या चौकशीत पोवळे ही महिला घरातूनच सेक्स रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत समाजसेवा शाखा अधिक तपास करत आहे.नवी मुंबई परिसरात पोवळे कुटुंबीयांसोबत राहते. ती गृहिणी आहे. घरी आईवडील दोन मुले आणि पती आहे. पठाणही त्याच परिसरात राहतो. तो रिक्षाचालक आहे. तो विवाहित असून, त्यालाही मुले आहेत. पोवळे त्याच्या मदतीने हे सेक्स रॅकेट चालवत होती. मौसीन हा तिचा जवळचा मित्र असल्याची माहिती समाजसेवा शाखेने दिली.ते किती वर्षांपासून हे सेक्स रॅकेट चालवित आहेत? यामध्ये आणखीन किती जणांचा सहभाग आहे? याचे जाळे कुठपर्यंत पोहोचले आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. दोघांच्याही अटकेला समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गिड्डे यांनी दुजोरा दिला.>बेघर मुली रडारवररस्त्यावरील बेघर, तसेच आईवडिलांच्या संपर्कात असलेल्या अल्पवयीन मुली, तरुणी त्यांच्या रडारवर असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यांना आधार देण्याच्या नावाखाली ते वेश्याव्यवसायात ढकलत असत. याची शहानिशा समाजसेवा शाखा करत आहेत. दोघांच्या चौकशीतून खूप मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :सेक्स गुन्हा