शिवडी-चेंबूर मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:09 IST2021-09-06T04:09:58+5:302021-09-06T04:09:58+5:30

मुंबई : मागील काही दिवस मुंबईत सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची पुन्हा दुरवस्था झाली आहे. शिवडी-चेंबूर मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात ...

Sewing of Shivdi-Chembur road due to potholes | शिवडी-चेंबूर मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण

शिवडी-चेंबूर मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण

मुंबई : मागील काही दिवस मुंबईत सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची पुन्हा दुरवस्था झाली आहे. शिवडी-चेंबूर मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. मुख्य मार्गासोबतच या रस्त्यावरील स्वामी नारायण उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत.

या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने येथे दरवेळी खड्डे पडतात. भल्या मोठ्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने येथे वाहनांचे सतत अपघात घडत आहेत. अनेकदा या खड्ड्यांचा सामना अवजड वाहनांनाही करावा लागतो. यामुळे वाहने रस्त्यात बंद पडून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहन चालक करत आहेत.

Web Title: Sewing of Shivdi-Chembur road due to potholes